ऐतवडे खुर्द: शिराळा येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांना वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द पत्रकारिता विभागाच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षीचा साहित्यप्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवारी ११ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वारणा संकुलामध्ये होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत असून आ.सत्यजित देशमुख,सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती आहे.
यावेळी डॉ.प्रतापराव पाटील म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अधिक काळ काम करणाऱ्या व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पत्रकारांचा सन्मान व्हावा व त्यांच्या लेखणीला बळ देण्यासाठी पत्रकार सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते. याबरोबरच पंचवीस वर्षाहून अधिक काळ ज्यांनी पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम केले आहे : त्या वाळवा, शिराळा, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यातील दोन पत्रकारांना साहित्यप्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा साहित्यप्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कोडोली परिसरातून दै. पुढारीचे पत्रकार संजय भोसले यांना तर शिराळा तालुक्यातून दै.सकाळचे पत्रकार शिवाजीराव चौगुले यांना घोषित झाल्याची माहिती पत्रकारिता विभागाच्या वतीने देण्यात आले. शिवाजी विद्यापीठातील पदवीपर्यंतचे पत्रकारीता विभागाचे शिक्षण देणारे हे एकमेव महाविद्यालय असून महाविद्यालयातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी पत्रकारीतेची पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारिता विभागाचे अनेक विद्यार्थी सध्या महाराष्ट्रभर विविध दैनिकांमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. पत्रकारिता विभागाच्यावतीने परिसरातील पत्रकारांच्या उदबोधनासाठी अनेक व्याख्यानांचे ही आयोजन करण्यात येते. याबरोबरच पत्रकारांना पदवीपर्यंतचे नियमित शिक्षण घेण्यासाठी ही प्रोत्साहित करण्यात येते .गेली पंचवीस वर्ष अखंडित सुरू असलेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी व स्नेहभोजनासाठी परिसरातील सर्व पत्रकार बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रताप पाटील यांनी केले.
0 Comments